श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
दहिवडी ता. माण, जि. सातारा
विना सहकार नाही उध्दार !
कै.श्री.वाघोजीराव पोळ (काका)
वृक्षारोपण उपक्रम.
रक्तदान शिबीराचे वेळोवेळी आयोजन.
गरजु सभासदांना हृदय शस्त्रक्रियेसाठी भरीव अर्थिक मदत.
कुपोशित बालकांना मोफत पोषक आहार औषधे वाटप.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत.
शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप.
दुष्काळी परीस्थितीत संस्था संचलित जनावरांना चारा छावण्या चालू करून पशुधनाला संजीवणी.
वृध्द व्यक्तिकरिता नेत्र चिकीत्सा शिबीराचे आयोजन.
महिला सभासदांसाठी हळदीकुंकु समारंभ व गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन.
शालेय लेझीम पथकातील विद्यार्थ्याना गणवेश वाटप.
स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत डस्ट बिन चे वाटप.
मुस्लीम सभासद व खातेदारांना इफ्तार पार्टीचे आयोजन.
सभासद गुणवंत विद्यार्थी गुणगौरव पुरस्कारचे आयोजन.
अपंग विद्यार्थ्याना मोफत सायकलींचे वाटप.
सन्माननीय सभासद बंधू - भगिनींनो, आपण माझ्यावर अत्यंत विश्वासने सोपविलेली चेअरमन पदाची जबाबदारी पार पाडताना संस्थेच्या यशोशिखराकडे नेणे हे एकच ध्येय ठरविले आहे. यासाठी व्हा. चेअरमन श्री. सुरेश इंगळे, संचालक मंडळ, सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे.
संस्थेचे संस्थापक मा. श्री. वाघोजीराव पोळ ( काका ) यांचे सतत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याचे मी आवर्जुन नमुद करतो, तसेच संस्थापक मा. श्री. वाघोजीराव पोळ ( काका ) यांच्या दुरदृष्टीमुळे संस्थेने जिल्ह्यात सामाजिक व आर्थिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा निर्माण करुन इतरांकरिता आदर्श निर्माण केलेला आहे. श्री. सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दहिवडी ही आज सर्व सामान्यांच्या दृष्टीने वटवृक्षाची सावली प्रमाणे खंबीरपणे उभी आहे. या वटवृक्षाची पाळेमुळे खोलवर रुजवूण त्याचा लाभ सर्वसामान्य बांधवांना देणेच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे. आत्तपर्यंत केलेले काम अभिमानास्पद आहे, परंतु अपुर्ण राहिलेली कामही खुप आहे. सर्व सामान्यांच्या गरजा पुर्ण करुन संस्थेच्या परिसराचा कायापालट घडवून आर्थिक विकासाचे व प्रगतीचे नवे पर्व निर्माण करावयाचे आहे. त्यासाठी कामाची गती वाढली पाहिजे. आपणासर्वांचे जीवन आनंदी व समृध्द करण्याचे आपले स्वप्न आपणांस साकार करण्याचे आहे. आत्तापर्यंतच्या प्रगतीचा वेग कायम राखणेसाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. संचालक मंडळ, सभासद, खातेदार, अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग व हितचिंतक या सर्वांचे सक्रीय सहभागातूनच हे स्वप्न साकार होईल असा दृढविश्वास आहे. सहकार्य, प्रेम, जिद्द व चिकाटी यांचे जोरावर एक नवा आदर्श आपल्या संस्थेच्या रुपाने समाजात निर्माण करावयाचा आहे. तसेच मी सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक, कर्मचारी यांना नम्रपणे विनंती करतो कि, सर्वानी जास्तीत जास्त ठेवी आपल्या संस्थेकडे कशा वर्ग करता येतील हे पहावे व संस्थेच्या प्रगतीला हातभार लागावा अशी अपेक्षा ठेवतो. तसेच कर्जदार सभासदांनी सुध्दा घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमितपणे करुन आपले कर्तव्य पार पाडून पतसंस्थेस सहकार्य करावे व कायदेशीर वसुलीचे कटु प्रसंग टाळावा. आजपर्यंत आपले संस्थेस विविध अशा पुरस्कारांनी सन्मानित केलेले असून आपले असेच बहुमोल सहकार्य संस्थेला लाभो व संस्थेची वाटचाल उत्तुंग शिखरावर पोहोचो हिच सदिच्छा....
वृत्तपत्र बातम्या
इतर बातम्या
संस्थेची वैशिष्टे
ठेवीवर जास्तीत जास्त व्याजदर.
प्रशिक्षीत संचालक व सेवक वर्ग.
विनम्र व तात्काळ आपुलकीची सेवा.
तात्काळ सोनेतारण व कृषी सोनेतारण कर्ज सुविधा.
संस्थेची स्वमालकीची ९ शाखांसाठी इमारती.
शाखाप्रमुखांसाठी शाखा सातारा, कोरेगांव, कराड, फलटण या ठिकाणी संस्था मालकीचे निवासी फ्लॅट.
नियमित कर्ज फेड करणार्‍या कर्जदार सभासदांना जमा व्याजाच्या १०% रिबीट परतावा.
सभासदांना १२.५ % लाभांश वाटप.
संस्था स्थापनेनुसार सतत ऑडीट वर्ग "अ".
Copyright 2015 @ Promeetra Software
Visitors :
470456