श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
दहिवडी ता. माण, जि. सातारा
विना सहकार नाही उध्दार !
कै.श्री.वाघोजीराव पोळ (काका)
पतसंस्थेमध्ये आपले स्वागत
सन १९९० साली श्री. वाघोजीराव पोळ काकांनी सर्व सहकारी मित्रांच्या मदतीने पतसंस्था रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला. दहिवडी हे माणगंगा नदीच्या तिरावर वसलेले गाव आहे. या गावात श्री. सिद्धनाथाचे जागृत ग्रामदैवत आहे. त्यावेळी सर्व मित्रांशी विचार करुन श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था हे नाव निश्चित केले आणि शेअर्स गोळा करण्यास सुरुवात केली. अशामध्ये लोकांकडून शेअर्स गोळा करताना काकांनी पैसे तुमचे बुडणार नाहीत माझ्यावर विश्वास ठेवा असे सांगुन शेअर्स गोळा केले. तत्काळ मंत्री अभयसिंहराजे भोसले (महाराज) यांची भेट घेऊन त्यांच्याकडून शिफारस पत्र घेतले व संस्था रजिस्टर झाली. लोकांचा विश्वास बसला.लोक हळुहळु पैसे ठेवू लागले.काका मिल्ट्री मध्ये असल्याने त्यांच्या अंगीच शिस्त बिनलेली. ती शिस्त कर्मचारी, संचालकांना लावल्याने हळुहळु संस्था आकार घेऊ लागली संस्थेने १६१ कोटी ठेवी जमा केल्या. २०१६ साली संस्थेने २०० कोटीचे उद्दिष्ट पार करण्याचा निश्चय केला आहे. संस्थेला गेल्या २५ वर्षात ऑडीट वर्ग 'अ' मिळाला.  
ठेव योजना   

कर्ज योजना

मुदत ठेव

दामदुप्पट योजना


वृत्तपत्र बातम्या
इतर बातम्या
संस्थेची वैशिष्टे
ठेवीवर जास्तीत जास्त व्याजदर.
प्रशिक्षीत संचालक व सेवक वर्ग.
विनम्र व तात्काळ आपुलकीची सेवा.
तात्काळ सोनेतारण व कृषी सोनेतारण कर्ज सुविधा.
संस्थेची स्वमालकीची ९ शाखांसाठी इमारती.
शाखाप्रमुखांसाठी शाखा सातारा, कोरेगांव, कराड, फलटण या ठिकाणी संस्था मालकीचे निवासी फ्लॅट.
नियमित कर्ज फेड करणार्‍या कर्जदार सभासदांना जमा व्याजाच्या १०% रिबीट परतावा.
सभासदांना १२.५ % लाभांश वाटप.
संस्था स्थापनेनुसार सतत ऑडीट वर्ग "अ".
Copyright 2015 @ Promeetra Software
Visitors :
465858